जळगाव जिल्हाराजकीय

भाजपा निरीक्षकांची आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासोबत भेट; प्रचाराची रणनीती ठरली



पाचोरा – पाचोरा भडगाव मतदार संघातील महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा समन्वय, प्रचारातील आपापसातील संवाद नियोजन संदर्भात चर्चा करून निवडणुकीदरम्यान करावयाच्या प्रचाराची रणनीती ठरविण्यात आली.यावेळी भारतीय जनता पक्षाचे पाचोरा विधानसभेचे निरीक्षक तथा गांधीनगर (गुजरात) महापालिकेचे उपमहापौर प्रेमळसिंहजी गोल,अनिल भाई शहा (गांधीनगर) यांनी आमदार किशोर आप्पा पाटील पाटील यांची भेट घेतली.
पाचोरा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता जनता पक्ष हा पूर्ण ताकदीनिशी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठीशी राहणार असून मोठ्या मताधिक्याने ही जागा आपण जिंकणार असल्याचा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. पाचोरा मतदार संघाचा झालेला विकास हा जनतेच्या डोळ्यासमोर असून सर्वसामान्य जनता ही कायम विकास करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी राहते असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला, त्यांच्या समवेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे माजी शहरप्रमुख नंदू सोमवंशी यांची उपस्थिती होती.
दरम्यान पाचोरा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या बंडोखरावर आम्ही पक्षातून हाकलपट्टीची कारवाई केली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट करत त्यांच्यासोबत असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा अहवाल हा वरिष्ठांना पाठवला असून याची पक्षाने योग्य दखल घेतली असल्याचे देखील त्यांनी यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांना सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील तालुकाप्रमुख सुनील पाटील उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर बाजार समिती सभापती गणेश पाटील माजी नगराध्यक्ष संजय गोहिल आदी पदाधिकारी यांची उपस्थिती होती


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button