उबाठा शिवसेनेच्या वैशाली सुर्यवंशी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा…
पाचोरा –
राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असुन त्याच अनुषंगाने कर्तृत्ववान नैतृत्व म्हणून पाचोरा मतदार संघात ओळख असलेल्या स्व. आर. ओ. तात्या पाटील यांच्या कन्या वैशाली सुर्यवंशी यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने मतदार संघात परिवर्तनाचे वारे वेगाने वाहतांना दिसुन येत आहेत. पाचोरा मतदार संघातुन वैशाली सुर्यवंशी यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे सद्यस्थितीत चित्र दिसुन येत आहे. गावा गावात वैशाली सुर्यवंशी यांचा वाढता प्रतिसाद बघावयास मिळत आहे. वैशाली सुर्यवंशी यांचे हात अजुन बळकट करण्यासाठी पाचोरा येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार तसेच जळगाव जिल्हा अध्यक्ष आनंद खरात, तालुका अध्यक्ष विनोद अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वैशाली सुर्यवंशी यांना जाहिर पाठिंबा देण्यात आला आहे. जाहिर पाठिंब्याच्या पत्रावर विभागीय अध्यक्ष भालचंद्र ब्राम्हणे, तालुका अध्यक्ष विनोद अहिरे, तालुका उपाध्यक्ष रामदास गायकवाड, जिल्हा सरचिटणीस गौतम निकम, शहर अध्यक्ष प्रविण बागुल, तालुका सचिव सतिष सोनवणे यांच्या सह्या आहेत.