प्रतापराव हरी पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ पूनमताई पाटील यांच्या दुपार सत्रात निंभोरी, वाणेगाव, वाडी,शेवाळे येथे प्रचारात आघाडी
पाचोरा –
पाचोरा भडगाव विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ पूनमताई पाटील यांच्या प्रचार रॅलीने आघाडी घेतली असून ही या रॅलीने मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे या रॅलीची दुपार सत्राची सुरुवात निभोरी या गावातून करण्यात आली निंभोरी येथे विठ्ठल रुक्माई व माहुजी मंदिराचे दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात करण्यात आली प्रचार रॅलीमध्ये डॉ पूनमताई पाटील यांचे घरोघरी औक्षण करण्यात आले या प्रचारांमध्ये निंभोरी येथील कार्यकर्ते विकास शेळके दीपक पाटील बबलू पाटील रोहिदास कोळी गोकुळ राहुत इत्यादी उपस्थित होते तर निंबोरी याच गावांमध्ये महादेव मंदिरात स्थानिक कार्यकर्ते उत्तमराव नरवाडे यांच्या शुभहस्ते श्रीफळ पाण्यात आले याप्रसंगी समाधान चंदनी शरद शेळके इत्यादी मतदारांनी प्रचार रॅलीत सहभागी झालेत या रॅलीसाठी उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला
वाणेगाव– वाणेगाव तालुका पाचोरा या ठिकाणी स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रताप हरी पाटील यांच्या प्रचार रॅलीची सुरुवात राधाकृष्ण मंदिर यांचे दर्शन घेऊन करण्यात आली या रॅली यामध्ये डॉ पूनमताई पाटील यांचे या गावात घरोघरी औक्षण करण्यात आले या प्रचार रॅलीसाठी तरुण वर्ग महिला वर्ग यांनी उत्तम असा प्रतिसाद दिला या प्रचार रॅली चा प्रचार प्रसार करण्यासाठी स्वराज्य पक्षाचे सप्तकीरणातील पेनाची नीप हे चिन्ह घरोघरी पोचवण्यातआले व मतदारांचे आशीर्वाद घेण्यात आले यावेळी वाणेगाव येथील स्थानिक कार्यकर्ते धनराज पाटील गुलाब पाटील शांताराम पाटील भालचंद्र पाटील नवल वऱ्हाड यांनी सहभाग घेतला त्यामुळे प्रचार रॅलीला उत्तम असा प्रतिसाद मिळाला
शेवाळे– शेवाळे या गावात स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ पूनमताई पाटील यांच्या निघालेल्या प्रचार रॅली ची सुरुवात चौकातून करण्यात आली या प्रचार रॅलीमध्ये डॉ पूनमताई पाटील यांनी घरोघरी जाऊन स्वराज्य पक्षाचे चिन्ह सप्त किरणातील पेनाची निप याचा प्रचार व प्रसार केला व मतदारांची आशीर्वाद घेतले या प्रचार रॅलीत डॉ पूनम ताई पाटील यांचे ठिकठिकाणी औक्षण करण्यात आले याप्रसंगी त्यांना उत्तम असा प्रतिसाद सर्वच ठिकाणी मिळाला डॉ पूनमताई पाटील यांनी प्रचारात घेतलेली आघाडी पाहून परिसरात त्यांच्या रॅलीची सर्व दूर चर्चा होत आहे या रॅलीमध्ये स्थानिक कार्यकर्ते म्हणून जितेंद्र शिंपी, दत्तू काकडे, भैया बदर, निवृत्ती नेरपगार, भगवान न्हावी यांनीही या रॅलीत सहभाग घेऊन रॅली यशस्वीपणे पार पडली
*वाडी*- या गावातही नानासाहेब यांच्या प्रचारार्थ डॉ पूनमताई पाटील यांच्या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून त्यांचेही ठीक ठिकाणी औक्षण करण्यात आले या रॅलीमध्ये स्थानिक कार्यकर्ते संजय पाटील, अनिल पाटील, शांताराम पाटील, रवींद्र पाटील, पंकज पाटील, बापूराव पाटील यांनी सहभाग घेतला अशाप्रकारे दुपार सत्रातील रॅलीने घरोघरी जाऊन प्रचार व प्रसार केल्याने प्रचारात आघाडी घेतली