शिवकमल शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे विविध साहित्य वाटप
पाचोरा – नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतील नर्मदा व तापी नदीच्या खोऱ्यातील अतीदुर्गम भागातील तसेच धुळे जिल्ह्यातील विविध भागात व शिरपूर तालुक्यात आणि जळगाव जिल्ह्यात आदिवासी व गरजू बांधवांना शिवकमल शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे आपण समाजाचे काही देणे लागतो या उदात्त आणि निस्वार्थ भावनेने विविध खाद्य पदार्थ, कपडे व शैक्षणिक तसेच इतर जीवनोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले सदर साहित्य वाटप प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अमोल महाजन यांनी सांगितले की आमची संस्था आणि आम्ही फक्त या उपक्रमाचे माध्यम असून समाजातील अनेक दात्यांच्या माध्यमातून ही सेवा आम्ही प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करीत आहोत तसेच आमच्या संस्थेला विविध क्षेत्रातील समाजातील सामाजिक भावना जागृत असलेल्या मान्यवरांच्या मदतीने हे शक्य झाले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले सदर प्रसंगी संस्थेचे सभासद विलास महाजन, गुड्डू राजपूत, गणेश महाजन व आदी उपस्थित होते