मुहूर्त ठरला…आणि प्रतीक्षा संपली…28 ऑक्टोबर,सोमवार रोजी अमोल शिंदे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून शंखनाद करणार
पाचोरा-
येथील भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा केली असून विधानसभा निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून अत्यंत कमी मताने पराभूत झालेले अमोल शिंदे यांनी मागील विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या पाच वर्षापासून न थांबता सतत मतदारसंघातील जनतेच्या सुख-दुःखात उभे राहत आपला जनसंपर्क अजून जोमाने वाढवला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेले आशीर्वाद,प्रेम आणि दाखविलेला विश्वासावर मी जवळपास 75 हजार मते मिळवू शकलो आणि यावेळी देखील जनतेतून मिळणारा प्रतिसाद बघता आणि त्यांच्या भावना लक्षात घेता मी जनतेचा उमेदवार म्हणून दिनांक 28 ऑक्टोबर 2024 सोमवार रोजी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असुन सकाळी १०:०० वाजता भारत डेअरी चौफुली येथून रॅलीला सुरुवात होऊन मारुती मंदिर व सप्तशृंगी माता मंदिर कृष्णापुरी – आठवडे बाजारात (परिवर्तन सभा)- गांधी चौक – जामनेर रोड मार्गे – छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीची सांगता होईल तरी मोठ्या संख्येने मला आशीर्वाद व पाठिंबा देण्यासाठी पाचोरा-भडगाव मतदार संघातील जनतेने उपस्थित रहावे असे अमोल शिंदे यांनी आवाहन केले आहे.