पाचोरा गुर्जर समाजातील गुणवंत गौरव सोहळा – २७ ऑक्टोबर रोजी आयोजन
पाचोरा – येथे ता. २७ ऑक्टोबर २०२४: पाचोरा तालुका आणि परिसरातील समस्त गुर्जर समाजाच्या वतीने गुणवंत गौरव सोहळा दिनांक २७ ऑक्टोबर २०२४ रोजी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येत आहे. समाजातील विविध पोटजातीतील गुणवंत विद्यार्थी, विशेष प्राविण्य मिळविलेले व्यक्ती तसेच त्यांचे पालक या सोहळ्यात सन्मानित होणार आहेत.
समारंभाचा तपशील
समारंभ रविवार, २७ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता स्वामी लॉन्स, गजानन पेट्रोलपंपाजवळ, भडगाव रोड, पाचोरा येथे आयोजित करण्यात आला आहे. गुणवंत विद्यार्थी, पालक व समाजातील सर्व मान्यवरांनी कार्यक्रमास वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुरस्कार वितरणाच्या वेळी क्रमांकानुसार न करता अचानक कोणत्याही क्रमांकापासून वितरण सुरू होईल. त्यामुळे सर्व पुरस्कारार्थीनी सकाळी ९.३० पासूनच उपस्थित राहणे बंधनकारक आहे. याशिवाय, गैरहजर असलेल्या किंवा उशिरा येणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार नाही या कार्यक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, उद्योगजक, व्यवसायिक यांनी आपल्या नावे बक्षिसे देऊ शकतात. स्मृतीचिंन्हावर त्यांची नावे नमूद केली जातील. यासोबतच दानशूर व्यक्ती किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना सन्मानित करण्याचीही व्यवस्था आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावर देणगी स्वीकृतीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, समाजातील सर्व बंधु-भगिनींनी आपल्या स्तरावर कार्यक्रमाची माहितीइतरांपर्यंत पोहोचवावी, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: – 7385108510