परिवर्तन करा, अन्यथा येणाऱ्या पिढ्या माफ करणार नाहीत : वैशालीताई सुर्यवंशीगिरणा नदी संवर्धन चर्चासत्रातून ग्रामस्थांना घातली साद
पाचोरा : ”सध्या जे काही सुरू आहे त्यात बदल करावयाचा असेल तर निवडणुकीत परिवर्तन करा, अन्यथा येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत !” अशा शब्दांमध्ये शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी ग्रामस्थांना साद घातली. त्या गिरणा संवर्धन चर्चासत्रात बोलत होत्या.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वैशालीताई सुर्यवंशी यांच्या वचननाम्यात गिरणा नदीचे संवर्धन करण्याचे अभिवचन देण्यात आले आहे. या अनुषंगाने निवडणुकीआधी त्या गिरणा संवर्धन चर्चासत्राच्या माध्यमातून ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. याचा शुभारंभ ओझर आणि कुरंगी येथे करण्यात आला. या दोन्ही गावांमध्ये जाऊन ताईंनी गिरणा वाचविण्याचे महत्व आणि त्यासाठी करण्याच्या उपाययोजनांवर उहापोह केला. या दोन्ही गावांमध्ये ग्रामस्थांच्या वतीने ताईंचे स्वागत करण्यात आल्यानंतर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी वैशालीताई म्हणाल्या की, कधी काळी गिरणा नदीचे पात्र हे भरलेले असल्याने परिसर सुपीक होता. मात्र काळाच्या ओघात गिरणेची माया आटली. आपण वाळू उत्खननाच्या माध्यमातून या लोकमातेवर अत्याचार केले. यामुळे गिरणा काठ उध्दवस्त झाला आहे. यातच जलसिंचनाच्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांनी नार-पार तसेच एक्सप्रेस कॅनॉलसाठी प्रयत्न करून देखील त्यांना याचा पुढे पाठपुरावा करता आला नाही. तर नंतरच्या नेतृत्वाने याकडे लक्षच दिले नाही. एवढेच नव्हे तर आमदार आता शेतकऱ्यांनी कपाशी नव्हे तर ज्वारी-बाजरी लावण्याचा सल्ला देण्याचे काम सुरू केले आहे. सर्व बाजूंनी शेतकरी नाडला जात असल्याने आता निवडणुकीच्या माध्यमातून बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वैशालीताई सुर्यवंशी यांनी याप्रसंगी केले. दरम्यान, याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांनी आमदारांवर जोरदार टिकास्त्र सोडले. पराभव समोर दिसत असल्याने ते बिथरले असल्याचा टोला देखील त्यांनी मारला.
या संवाद चर्चासत्राला ओझर येथे वैशालीताई सुर्यवंशी, दीपक राजपूत, अरूण पाटील, उध्दव मराठे, रमेश बाफना, योजना पाटील, वर्षा पाटील, दीपाली पाटील, आनंदा पाटील, यशवंत पाटील, पितांबर पाटील, राजेंद्र पाटील, गुलाब पाटील, राजेंद्र पाटील, निलेश पाटील, भरत पाटील, धनराज धनगर, युवराज पाटील, बाळू पाटील, आबासाहेब पाटील, संजय पाटील, ज्ञानेश्वर पाटील, शशिकांत पाटील, विशाल पाटील, डॉ. ज्ञानेश्वर पाटील, स्वप्नील भातखंडे, राज पाटील, भगवान कोतवाल, दीपक राजपूत, शरद कोळी, वाल्मीक कोळी, संदीप परदेशी, संदीप गुजर यांची उपस्थिती होती.
तसेच कुरंगी येथे वैशालीताई सुर्यवंशी, अरूण पाटील, शरद पाटील, विनोद बाविस्कर, राजूभैय्या, एकनाथ महाजन, रामचंद्र धनगर, मनोहर पाटील, रवींद्र पवार, मोहन पाटील, मिथुन वाघ, बापू पाटील, धूराज पाटील, नितीन पाटील, सुनील पाटील, राजू पाटील, भरत पाटील, सुभाष पाटील, जयाताई पाटील, ज्येष्ठ नागरिक भरत पाटील, रवींद्र पाटील, धनराज पाटील, नितीन महाजन, सुभाष पाटील, शांताराम बडगुजर, कोमलसिंग पाटील शांताराम पाटील, विठ्ठल पाटील, हरून शेख, दत्तू अहिरे, गुलाब पाटील, विनोद पाटील, समाधान पाटील, मनोहर पाटील, निंबा विक्रम पाटील, बापू पाटील, वाल्मीक पाटील, हिरामण पाटील, महेश पाटील, भगवान पाटील, पंकज श्रावगे, अक्षय धनगर, मनोहर पाटील, पप्पू पाटील, समाधान पाटील, सागर पाटील, लोकेश पाटील, समाधान पाटील, अजय पाटील, महेश पाटील आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.