मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पाचोरा तालुक्यातील 74 कोटींचे 8 रस्ते मंजूर; आमदार किशोर आप्पा पाटील यांचे यश
पाचोरा –
गेले अनेक दिवस मागणी असून प्रलंबित असलेल्या पाचोरा तालुक्यातील 56 किलो किलोमीटर लांबी असलेल्या 8 रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत एकूण 74 कोटी 31 लक्ष रुपयाच्या कामांना मान्यता मिळाली असून तात्काळ या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांच्या वतीने देण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश नुकताच 9 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाला आहे.
पाचोरा तालुक्यातील होळ ते सांगवी हा सुमारे तीन किलोमीटरचा रस्ता, लासगाव कुरंगी ते दुसखेडा हा सुमारे 11 किलोमीटर लांबी असलेला रस्ता, वडगाव आंबे सावखेडा खुर्द सावखेडा बुद्रुक भोजे चिंचपुरा जवखेडा जिगर ते शिंदाड हा सुमारे दहा किलोमीटर लांबी असलेला रस्ता, लोहारी बुद्रुक आर्वे मोंढाळा खडकदेवळा बुद्रुक हा सुमारे आठ किलोमीटर लांबी असलेला रस्ता, नगरदेवळा निपाणी ते तालुका हद्द पिंपरी हा सुमारे आठ किलोमीटर लांबी असलेला रस्ता, निपाणी ते आखतवाडी हा सुमारे तीन किलोमीटरचा रस्ता, नावरे बांबरुड मळगाव ते तालुका हद्द वडाळा हा सुमारे पाच किलोमीटरचा रस्ता, निंभोरा बोदरडे बोरनार ते घुसर्डी सुमारे आठ किलोमीटर लांबीचा रस्ता असे एकूण सुमारे 56 किलोमीटर लांबी असलेल्या आठ विविध रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे.
दरम्यान या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सहकार्य लाभले असून त्यांचे आमदार किशोर पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत.