प्रामाणिकपणाचे फळ नक्कीच मिळणार : वैशालीताई सुर्यवंशीशेतकरी शिवसंवाद यात्रेत ग्रामस्थांच्या वार्तालापास उत्स्फुर्त प्रतिसाद
भडगाव – मी प्रमाणिक समाजसेवा करण्यासाठी राजकारणात आली असून याचे फळ नक्कीच मिळणार असे प्रतिपादन शिवसेना-उबाठा पक्षाच्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी शेतकरी शिवसंवाद यात्रेत केले.
शेतकरी शिवसंवाद यात्रा बुधवारी सकाळच्या सत्रात कजगाव, भोरटेक, उमरखेड, तांदळवाडी आणि मळगाव येथे काढण्यात आली. यात कजगाव येथील अनिल टेलर, राजू चव्हाण, दिनेश पाटील, अरूण महाजन, अमित बागवान यांनी विविध समस्या मांडल्या. यात स्मशानभूमिची दुर्दशा, रस्ते आदी समस्यांवर चर्चा करण्यात आली. यानंतर भोरटेक येथील संजय महाजन, सुनील महाजन, सुनील धनगर, उमेश देशमुख, बाबूलाल तेली, संजय महाजन व यांनी चंदनपुरी ते भोरटेक भुयारी मार्ग असावा अशी मागणी केली.
उमरखेडे येथील ग्रामस्थांनी गावात सभामंडप असावे अशी मागणी करतांना गटारी व रस्त्यांचे कामे करण्याची मागणी केली. तांदुळवाडी येथे संजय खैरनार, भाऊसाहेब पाटील, अर्जुन सोनवणे, अरूण खैरनार आणि राजेंद्र महाजन यांनी वैशालीताई सुर्यवंशी यांच्याशी वार्तालाप करतांना त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली.
दरम्यान, वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, माझ्या विरूध्द बोलण्यासाठी काहीही नसल्याने विरोधक आता अफवा पसरवत आहेत. तथापि, मी माझ्या वडिलांप्रमाणेच प्रामाणिक राजकारण करणार असून याचे फळ मला नक्कीच मिळेल असा विश्वास आहे. अर्थात, यासाठी आपण सर्वांनी माझ्या पाठीशी समर्थपणे उभे रहावे असे देखील त्यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले.
आजच्या यात्रेत गणेश परदेशी, दीपक पाटील, जे. के. पाटील, पप्पूदादा, रतन परदेशी, योजना पाटील, चेतन रंगनाथ पाटील, चेतन पाटील, रोहित अहिरे, भैय्या सुर्यवंशी, मनोज पाटील, सोनू शिरसे, विकी पाटील, सत्यजीत पाटील, पप्पू पाटील, देवेन पाटील, जयेश पाटील, शाम सर, पृथ्वीराज पाटील, ईश्वर पाटील, सुभाष महाजन, नंदू पाटील, मनीषा पाटील आदींसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.