जळगाव जिल्हामहाराष्ट्र

महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे शिक्षक दिनानिमित्त पाचोरा येथे शिक्षक ग्राहक बांधवांचा सन्मान


पाचोरा – महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पाचोरा यांचे तर्फे शिक्षक दिनाच्या निमित्ताने पाचोरा शाखेचे ग्राहक असलेल्या शिक्षकांचा यथोचित सन्मान काल दिनांक 5 सप्टेंबर रोजी करण्यात आला. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे नाशिक विभागीय व्यवस्थापक सोमनाथ पाटील यांचे हस्ते यावेळी शिक्षक बांधवांना सन्मानित करण्यात आले.

पाचोरा शहरातील श्रेयस हॉस्पिटलच्या इमारतीत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक गणेश वानखडे यांनी यावर्षी शिक्षक दिनाची औचित्य साधून बँकेतील शिक्षक असलेल्या ग्राहकांचा सन्मान घडवून आणला. यावेळी बँक ऑफिसर विशाल सूर्यवंशी, सातगाव शाखेचे व्यवस्थापक नितीन निकम, कजगाव शाखा व्यवस्थापक राहुल दानव, आमडदे शाखा व्यवस्थापक पवनसिंह जाधव, बँकेचे कायदेविषयक सल्लागार ॲड. रणसिंग राजपूत,बँकेचे गोल्ड व्हॅल्यूअर योगेश जडे, मोहन बाविस्कर, व बँकांचे इन्शुरन्स मॅनेजर गणेश सिनकर उपस्थित होते.

याप्रसंगी बँकेच्या पाचोरा कार्यक्षेत्रातील 40 शिक्षकांना गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. बँकेचे विभागीय व्यवस्थापक सोमनाथ पाटील यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेची कार्यशैली, बँकेचा महाराष्ट्रातील व आपल्या कार्यक्षेत्रातील विस्तार, तसेच बँकेच्या विविध योजना याबाबत शिक्षक ग्राहकांशी हितगुज केले. उपस्थित प्रमुख अतिथी गिरणाई शिक्षण संस्थेचे सहसचिव शिवाजी शिंदे यांनी बँकेच्या या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक करत शिक्षकांच्या वतीने ऋणनिर्देश व्यक्त केला. पाचोरा शाखा lव्यवस्थापक गणेश वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले. बँक ऑफिसर विशाल सूर्यवंशी यांनी आभार प्रकटन केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button