जळगाव जिल्हामहाराष्ट्रराष्ट्रीय
पाचोरा न्यायालयात ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न
पाचोरा : आज देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पाचोरा न्यायालयात मुख्य न्यायाधीश जी बी औंधकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सह दिवाणी न्यायाधीश एस जी निमसे, वकील संघ अध्यक्ष प्रवीण पाटील, उपाध्यक्ष मंगेश गायकवाड, सचिव निलेश सूर्यवंशी, वरिष्ठ कनिष्ठ विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी तसेच इतर विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विशेष प्रसंगी हिरवांकुर फाउंडेशन, नाशिक तर्फे ॲड. शारदा पवार व ॲड. वर्षा पाटील उपस्थित होत्या. फाउंडेशनच्या वतीने विविध प्रकारचे औषधी वनस्पतीची रोपे उपस्थितांना वाटप करण्यात आली.