कानबाई चालनी गंगेवरी व माय !
विसर्जन मिरवणुकीत रंगल्या वैशालीताई सुर्यवंशी
पाचोरा : कानबाई विसर्जनाच्या दिवशी आज सर्वत्र चैतन्याचे वातावरण असतांना शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला.
खान्देशातील बहुतांश घरांमध्ये कानुमातेची स्थापना करून आराधना केली जाते. यानुसार यंदा देखील कानुमातेचे आगमन झाले असून आज अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात मातेला निरोप देण्यात आला. याप्रसंगी ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. यात पाचोरा शहरातील कृष्णापुरी, कोंडवाडा गल्ली व बाजारपेठ भागातील मिरवणुकांमध्ये वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी या सहभागी झाल्या. यात ठिकठिकाणी त्यांनी महिलांसह फुगड्या खेळून तसेच वाजंत्रीवर ताल धरून आनंदोत्सव साजरा केला.
याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सोबत तिलोत्तमाताई मौर्य, संदीप जैन, कुंदन पांड्या, गजानन सावंत, किरण चौधरी, मनोज चौधरी, हरी जवरे, संतोष पाटील, सचीन जगताप, योगेश महाजन, जितेंद्र चौधरी, यश महाले व संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.