रस्त्यावर मुरुम टाकण्या संदर्भात दिलेल्या निवेदनाची नगरपरिषदेनी घेतली दखल;केली कामास सुरुवात..
रस्त्यावर मुरुम टाकण्या संदर्भात दिलेल्या निवेदनाची नगरपरिषदेनी घेतली दखल;केली कामास सुरुवात..
पाचोरा-
दिनांक २ ऑगस्ट २०२४ रोजी भारतीय जनता पार्टी पाचोरा शहर अध्यक्ष योगेश ठाकूर यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते की,
पाचोरा नगरपरिषद प्रशासनास य वेळोवळी कळविण्यात आले असुन तरी संत गाडगेबाबा नगर, योगेश्वर नगर, कृष्णा रेसिडेन्सी, शेजवळकर नगर, जुना अंतुर्ली रोड वरील संपूर्ण भागात रस्त्यावर मोठ मोठे खड़्डे, पडल्याने चिखल झाल्याने रस्त्याची दुरावस्था झाली असुन मोठ मोठे अपघात होत आहेत.
तरी याकडे नगरपरीषद प्रशासन यांनी आज पर्यंत कुठल्याही ठिकाणी रस्त्याचे काम पुर्ण न झाले पर्याय व्यवस्था म्हणुन मुरुमसुध्दा टाकण्यात आलेला नाही. म्हणुन आपणास विनंती आहे की पर्याय व्यवस्था म्हणुन मुरुम टाकण्यात यावा, दोन दिवसात मुरुम टाकण्यात यावा अन्यथा तीव्र स्वरुपात आंदोलन करण्यात येईल, याची दखल घ्यावी.
या आशयाचे निवेदन भारतीय जनता पार्टी चे पाचोरा शहर अध्यक्ष योगेश ठाकूर यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत निवेदन दिले होते.
निवेदनाची नगरपरिषदेनी दखल घेऊन पर्यायी व्यवस्था म्हणून रस्त्यावर मुरुम टाकण्याचा कामास सुरुवात केली आहे.