जळगाव जिल्हामहाराष्ट्र

आगामी सहा महिन्यात पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करा -आ. किशोर आप्पा पाटील


आगामी सहा महिन्यात पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करा -आ. किशोर आप्पा पाटील
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस;
आ.किशोर आप्पा पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या उपस्थितीत आढावा
पाचोरा (वार्ताहर) दि.2
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील
जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सुमारे दीडशे गावात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांची गती वाढवून आगामी सहा महिन्यात सर्व योजनांची कामे पूर्ण करून मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला पिण्याचे मुबलक पाणी देऊन ‘हर घर नल,हर घर जल’ या घोषवाक्याला स्मरून सर्वानीच या योजनेला बळकटी देण्याचे काम सामूहिकपणे करावे, जे अधिकारी, ठेकेदार कामात कुचुराई करतील अशांची
आपण गय करणार नाही अशी तंबी यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली, ते पाचोरा येथे झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते .
या बैठकीत पाणीपुरवठा विभागाचे अभियंता
श्री. राठोड यांच्या कार्यशैलीमुळे त्यांच्या विरोधातील तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला.आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी 11 वाजता पाचोरा शहरातील टाऊन हॉल मध्ये ही बैठक संपन्न झाली.
बैठकीत पाचोरा व भडगाव तालुक्यात सुरू असलेल्या प्रत्येक गावाचा गाव निहाय आढावा घेण्यात आला. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणींची जागेवरच सोडवणूक या ठिकाणी करण्यात येऊन योजनेअंतर्गत कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषद चे कार्यकारी अधिकारी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.भोगवटे,प्रांताधिकारी भूषण अहिरे, पाचोरा
गटविकास अधिकारी स्नेहल शेलार,भडगाव गटविकास अधिकारी अन्सार शेख, भडगाव तहसीलदार श्री. बनसोडे,पाचोरा नायब तहसीलदार कुमावत यांच्यासह सर्व गावांचे सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार,वीज वितरण विभागाचे सहाय्यक अभियंते,नाबार्डचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मंचावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटिल,उपसभापती पी. ए. पाटिल , माजी नगराध्यक्ष संजय गोहिल पाचोरा तालुका प्रमुख सुनील पाटिल, भडगाव तालुकाप्रमुख संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंह पाटील,मधुकर काटे, स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
या बैठकीत भूजल सर्वेक्षणातून मिळालेला पाण्याचा स्रोत,पाईपलाईन,गावांतर्गत पाईपलाईन, पाण्याची टाकी बांधकाम आणि विषयात येणाऱ्या तांत्रिक अडचणी जास्त जागी सोडवण्यात आल्या यामुळे आगामी सहा महिन्यात या सर्व योजना पूर्णत्वास जाऊन मतदारसंघातील जनतेला आपण पिण्याचे मुबलक पाणी देण्याचा मानस यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी बोलून दाखवला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button