श्री.गो.से.हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम. वाघ मॅडम यांचा कर्तव्यपूर्ती सोहळा संपन्न
श्री.गो.से.हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम. वाघ मॅडम यांचा कर्तव्यपूर्ती सोहळा संपन्न
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से.हायस्कूल च्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम. वाघ मॅडम ह्या नियत वयोमानानुसार आज प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्यात. त्यांचा कर्तव्यपूर्ती समारंभ शालेय प्रांगणात भव्य स्वरूपात संपन्न झाला. समारंभाचे अध्यक्ष माजी आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष मा.भाऊसो. श्री.दिलीप ओंकार वाघ, तसेच संस्थेचे चेअरमन मा.नानासो.श्री.संजय ओंकार वाघ, व्हाईस चेअरमन मा.नानासो.श्री.व्ही. टी.जोशी, शालेय समिती चेअरमन मा.दादासो .श्री. खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन मा.
आण्णासो.श्री वासुदेव महाजन व संस्थेचे सन्माननीय संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत समारंभ संपन्न झाला.
प्रारंभी दिवंगत माजी आमदार व संस्थेचे माजी अध्यक्ष, शिक्षण महर्षी स्व.आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व सरस्वती पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर श्री.रुपेश पाटील व श्री.सागर थोरात सर यांनी ईशस्तवन सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनियुक्त मुख्याध्यापक श्री.एन.आर.पाटील सर यांनी केले.
मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्ती सौ.प्रमिलाताई वाघ मॅडम यांचा त्यांचे पती मा.तात्यासाहेब श्री.मधुकर वाघ यांच्यासह सेवापूर्ती निमित्त सत्कार करण्यात आला व शाळेतर्फे भेटवस्तू प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
तसेच शाळेचे नवनियुक्त मुख्याध्यापक श्री. एन.आर.पाटील सर व नवनियुक्त उपमुख्याध्यापक श्री.आर.एल.पाटील सर यांचा स्वागत व सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या प्रसंगी व्यासपीठावर मा.भाईसो.श्री.दुष्यंतजी रावल,मा.आण्णासो.श्री.दगाजी वाघ, मा.दादासो.श्री. अर्जुनदास पंजाबी, मा. तात्यासो.श्री मधुकर सांडू पाटील, मा.दादासो.श्री. योगेश माधवराव पाटील, मा.दादासो.श्री.पितांबर नथू पाटील,
मा.आप्पासो.श्री.सतीश नारायण चौधरी, मा.बाबासो.श्री.विनय मधुकर जकातदार, मा.भाऊसो. श्री.प्रकाश एकनाथ पाटील, मा.बापूसो.श्री शिवनारायण देवराम महाजन, मा.भाऊसो.श्री राकेश नंदलाल थेपडे , मा.ताईसो. सौ.जिजाबाई अभिमन्यू पाटील, मा.दादासो. श्री शशीभाऊ चंदिले, माजी नगराध्यक्ष श्री. विष्णू सोनार, गटशिक्षणाधिकारी श्री.समाधान पाटील साहेब, केंद्रप्रमुख श्री.अभिजीत खैरनार सर, श्री.भोयर सर उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यालयातील पर्यवेक्षक श्री.आर. एल.पाटील सर, श्री.ए.बी. अहिरे सर, पर्यवेक्षिका सौ. ए.आर.गोहील मॅडम, उपशिक्षिका श्रीमती श्रद्धा पवार मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.
सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ.प्रमिलाताई वाघ मॅडम यांनी त्यांच्या मनोगतात संस्थेविषयी ऋण व्यक्त केले.
तसेच शालेय समिती चेअरमन माननीय दादासो . श्री .खलील देशमुख, मा.भाईसो. श्री दुष्यंतजी रावल, श्री. निंबाजी पाटील यांनीसुद्धा या प्रसंगी मनोगत व्यक्त करून मॅडमना शूभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात माजी आमदार व संस्थेचे अध्यक्ष मा.भाऊसो.श्री दिलीप वाघ यांनी सौ. प्रमिलाताई वाघ मॅडम यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमप्रसंगी सौ. वाघ मॅडम यांचे नातलग, स्नेही, संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक व प्राचार्य, माजी मुख्याध्यापक, माजी पर्यवेक्षक, पत्रकार, तसेच शाळेतील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. आर.बी.बोरसे सर यांनी तर आभार श्री. उज्वल पाटील सर यांनी मानले.