देशमुख चित्रकला महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा १००% निकाल
देशमुख चित्रकला महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा १००% निकाल
*शासकीय उच्चकला परीक्षा 2024*
कलाशिक्षक प्रशिक्षण वर्ग *(ए. टी. डी.)प्रथम* वर्ष वर्गाचा *निकाल नुकताच जाहीर झाला* असून *स्व. अनिल दादा देशमुख चित्रकला महाविद्यालयाचा १००% निकाल लागला असून महाविद्यालयाचे ४ विद्यार्थी डिस्ट्रिक्टशन (जिल्हा स्तर) मध्ये उत्तीर्ण झाले.*
महाविद्यालयातून
*प्रथम क्रमांक – जोशी तीर्थराज विवेक (Dist.)*
*द्वितीय क्रमांक – पाटील वैष्णवी किरण ( Dist.)*
*तृतीय क्रमांक – पाटील सानिका शांताराम (Dist.)*
*चतुर्थ क्रमांक – पाटील वृषाली अरुण ( Dist.)*
*पाचवा क्रमांक – कासार प्रिया कैलास*
हे विद्यार्थी विशेष गुणांनी उत्तीर्ण झाले. *सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ. कुसूम मित्रा यांनी विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या.* तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. श्री. संदीप पाटील सर, प्रा. महेंद्र पाटील, प्रा. राहुल सोनवणे, संदीप परदेशी ,शुभम पाटील , जि. प. प्राथ. शाळा चिंचपुरे येथील मुख्याध्यापक सुभाष देसले सर व पालकांनी कौतुकास्पद अभिनंदन केले. *प्राचार्य श्री. संदीप पाटील सर यांनी यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून असेच यशस्वी व्हा, तुमच्यातील कला अशीच बहरत राहो तुमच्यातील कला कशी वाढवता येईल याकडे विशेष लक्ष द्या व पुढील वर्षी असेच यशस्वी व्हा अश्या सदिच्छा दिल्या..*