जळगाव जिल्हामहाराष्ट्र
श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा येथे शिक्षण सप्ताह सुरू विद्यार्थ्यांनी घेतला उत्साहात सहभाग
- श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा येथे शिक्षण सप्ताह सुरू
विद्यार्थ्यांनी घेतला उत्साहात सहभाग
पाचोरा ( प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गोसे हायस्कूल पाचोरा येथे शिक्षण सप्ताह दिनांक 22 जुलै ते 28 जुलै अध्ययन अध्यापन साहित्य दिवस विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित कलाकृती साहित्य बनवून पहिल्या दिवशी उत्साहात साजरा करण्यात आला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास भूगोल या विषयावर विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती साहित्य प्रयोग चित्रे काढून आकर्षक मांडणी तयार करण्यात आली ही मांडणी पाहून विद्यार्थी भरवले विद्यार्थ्यांची खुलाकृती सर्वांनाच आवडली याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उप मुख्याध्यापक नरेंद्र पाटील, पर्यवेक्षिका अंजली गोहिल, ज्येष्ठ शिक्षक प्रीतम सिंग पाटील सर्व विषयाचे शिक्षक यांनी उत्कृष्ट मेहनत घेऊन विद्यार्थ्यांकडून कलाकृती बनवून घेतल्या व कार्यक्रम यशस्वी घेतला सर्व शिक्षक बंधू भगिनी कार्यक्रमाला उपस्थित होते