जळगाव जिल्हामहाराष्ट्र
माजी आमदार दिलीप भाऊ वाघ व सुचिता ताई वाघ यांनी प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे पुरातन विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर हरेश्वर पिंपळगाव येथे घेतले दर्शन
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचे पुरातन मंदिर असून त्या ठिकाणी आषाढी एकादशीला दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यातील नागरिक येत असतात तसेच या ठिकाणी पाचोरा तालुक्यातील राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते यांची सुद्धा उपस्थित राहत असून यावेळी पाचोरा तालुक्याचे माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ व सुचिता ताई वाघ तसेच पाचोरा तालुका राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष श्री शालिग्राम मालकर कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी श्री दिलीप भाऊ वाघ व सौ सुचिताताई वाघ यांनी विठ्ठल रुक्मिणीला साकडे घालून प्रार्थना केली की यावर्षी पाचोरा तालुक्यात पाऊस चांगला येऊ द्या व शेतकरी राजा खुशी राहू द्या अशी प्रार्थना केली