माऊली अवतरली गो.से हायस्कूलच्या फलकावर अन् विठ्ठल नामाची शाळा भरली
माऊली अवतरली गो.से हायस्कूलच्या फलकावर अन् विठ्ठल नामाची शाळा भरली
पी.टी.सी.संचलित श्री.गो से.हायस्कूलच्या फलकावर आषाढी एकादशीनिमित्त शाळेचे कलाशिक्षक श्री सुबोध कांतायन सर यांनी रेखाटलेली विठ्ठलाची अप्रतिम रचना…
विठ्ठल नामाची शाळा भरली या गिताच्या ओळींना सरांनी स्वतःच्या कल्पनेतून साकारून श्री गो.से हायस्कूल चे विद्यार्थी विठ्ठलरुपी गुरू मार्गदर्शनातून मनन- राम ,वाचन- कृष्ण, चिंतन- हरी या रामकृष्णहरी
ज्ञानाचा अभ्यास करताना दिसत आहे.मानवी जीवनात अभ्यासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे अभ्यासामुळे मुलांमध्ये प्रगल्भता निर्माण होते तसेच त्यांना गुण व अवगुणाची पारख होते. शाळा ही ज्ञानाचे मंदिर आहे. चित्रातील विठ्ठलाची प्रतिमा व आभूषण अप्रतिम, रेखीव ,व सुबक पद्धतीने साकारली आहे.
सोबतच चित्रात शाळेची प्रतिमा सुद्धा हुबेहूब रेखाटली आहे. शाळेचा गणवेष परिधान करुन मुल अध्ययनात रंगली आहे.
सर्व विद्यार्थ्यानी या चित्राचा मनसोक्त आनंद घेतला.
या प्रसंगी पिटीसी संस्थेचे अध्यक्ष भाऊसो दिलीपजी वाघ, संस्थेचे चेअरमन नानासो संजय जी वाघ. संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासो व्हीं टी जोशी, शालेय समिती चेअरमन खलील दादा देशमुख
तांत्रिक विभाग चेअरमन वासुभाऊ महाजन, मुख्याध्यापिका सौ.पी.एम.वाघ, उप मुख्याध्यापक एन आर ठाकरे,पर्यवेक्षक आर.एल पाटील, ए. बी अहिरे, सौ .ए. आर. गोहील व सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी यानी चित्राचे भरभरून कौतुक करुन सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्यात.