जळगाव जिल्हामहाराष्ट्र
सामनेर येथील स्नेहल शिरोडे उच्च शिक्षणासाठी जर्मनीला रवाना
सामनेर येथील स्नेहल शिरोडे उच्च शिक्षणासाठी जर्मनीला रवाना
शहर प्रतिनिधी / पाचोरा
पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील रहिवासी व पाथरी ता. जळगाव येथील वि. का. संस्थेचे गटसचिव निंबा नारायण शिरोडे यांची कन्या कु. स्नेहल निंबा शिरोडे हिने संदीप फाऊंडेशन नाशिक येथे कॅम्पुटर आय. टी. चे शिक्षण पुर्ण घेऊन पदवी संपादन केली. त्यानंतर पुणे येथील के. पी. आय. टी. या कंपनीत तिन वर्ष नोकरी केली असता कंपनीने तिला विशेष पॅकेजसह विदेशात पाठविण्याचे ठरवले. आज १७ जुलै रोजी स्नेहल शिरुडे ही जर्मनी या देशात पुढील शिक्षणासाठी रवाना होणार आहेत. स्नेहल हिचा सामनेर येथील ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच गट सचिव संघटनेतर्फे सह परिसरातुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.