महात्मा फुले शिक्षक परिषदेतर्फे भावेश अहिरराव यांचा सत्कार
महात्मा फुले शिक्षक परिषदेतर्फे
भावेश अहिरराव यांचा सत्कार
पाचोरा–
तालुक्यातील शिंदाड येथील समाज विकास विद्यालयाचे गुणवंत शिक्षक तथा जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर पतसंस्थेचे संचालक भावेश अहिरराव सर यांची काल दि.11रोजी पतसंस्थेच्या मानद सचिव पदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक परिषदेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या जिल्हा नेतृत्वाने एकमुखाने निर्णय घेत पाचोरा तालुका व जळगाव जिल्ह्यातील शिक्षक चळवळीचे अग्रणी युवा नेतृत्व भावेश अहिरराव यांची पतसंस्थेच्या मानसचिव पदी काल निवड केली. या निवडीच्या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजी शिंदे यांनी अहिराव सर यांचा सपत्नीक सत्कार केला. या सत्कार प्रसंगी सौ श्रद्धा भावेश अहिरराव, सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (बॉईज) पाचोरा चे शिक्षक राजेंद्र भीमराव पाटील, खडकदेवळा हायस्कूलचे उपशिक्षक चंद्रकांत बाजीराव पाटील, जि प प्राथमीक शाळा गहुले तालुका पाचोरा येथील महेश दिनकर सोनवणे, एच.बी. सांघवी हायस्कूल (खेडगाव नंदीचे) येथील शिक्षक कृष्णराव साळुंखे सर आदी उपस्थित होते.