जळगाव जिल्हामहाराष्ट्र

श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा येथे कर्तव्यपूर्ती सोहळा संपन्न.

संपन्न. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे आज कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.


  1. श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा येथे कर्तव्यपूर्ती सोहळा संपन्न.
    पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे आज कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
    तांत्रिक विभागातील शिक्षक श्री.एन.बी.महाजन सर, श्री. एस.डी वाणी सर लिपिक श्री. भगवान पाटील, किमान कौशल्य विभागातील शिक्षक श्री.एस.जे. मनियार व शाळेतील प्रयोगशाळा सहाय्यक श्री.पांडुरंग माळी हे नियत वयोमानानुसार आज सेवानिवृत्त झालेत.
    संस्थेचे चेअरमन मा. नानासो.श्री.संजयजी वाघ, व्हॉइस चेअरमन मा. नानासो. श्री.व्ही.टी.जोशी, शालेय समिती चेअरमन मा. दादासो.श्री.खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन मा.अण्णासो. श्री.वासुदेव महाजन, ज्येष्ठ संचालक मा. आप्पासो.श्री.सतीश चौधरी या मान्यवरांच्या हस्ते वरील सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. श्री.रुपेश पाटील सर यांनी इशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात केली.
    सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी शाळा व संस्थेने त्यांना दिलेल्या सहकार्याबद्दल संस्था व शाळेच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे आभार मानले व कृतज्ञता व्यक्त केली.
    . शालेय समिती चेअरमन दादासो श्री.खालील देशमुख, मुख्याध्यापिका सौ.पी.एम.वाघ मॅडम, किमान कौशल्य विभागाचे प्रमुख श्री.मनीष बाविस्कर सर यांनी वरील सर्व सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या शाळा व संस्थेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव केला व सेवापूर्ती नंतरच्या त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी त्यांना आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या.
    याप्रसंगी उपमुख्याध्यापक श्री.एन.आर.ठाकरे सर, पर्यवेक्षक श्री.आर.एल.पाटील.सर, श्री. ए. बी.अहिरे सर, सौ.अंजली गोहिल मॅडम, तांत्रिक विभागाचे प्रमुख श्री.एस.एन.पाटील सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. आर.बी.तडवी सर, कार्यालयीन प्रमुख श्री.अजय सिनकर, वरील सर्व कर्मचाऱ्यांचे मित्र,नातेवाईक, कुटुंबीय व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर.बी. बोरसे सर, व आभार श्री.उज्वल पाटील सर यांनी केले.
    .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button