गुढे – वडजी जि. प. गटात वैशाली सुर्यवंशी यांचा प्रचाराचा झंझावात…
भडगाव तालुक्याने ठरवलं, वैशाली सुर्यवंशी यांना मताधिक्य देणार…
पाचोरा –
पाचोरा विधानसभा निवडणुकीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली सुर्यवंशी यांना मोठे मताधिक्य देवुन विधानसभेत पाठविण्याचा चंग भडगाव तालुक्याने बांधला असुन त्याप्रमाणे वैशाली ताई सुर्यवंशी यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रचारा रॅलीतुन मिळत आहे. वैशाली ताई सुर्यवंशी ह्या विकासाची मशाल हाती घेवुन निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय झाल्या आहेत. प्रचाराला अवघे दोन दिवस शिल्लक असले तरी पाचोरा शहर व तालुक्यासह भडगाव शहर व तालुक्यातील गावा गावात वैशाली ताई सुर्यवंशी झंझावाती प्रचार सुरुच आहे. वैशाली ताई सुर्यवंशी यांनी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासुन प्रचारात उत्तुंग अशी भरारी घेतली असून आजतागायत त्यांचीच प्रचारात आघाडी संपूर्ण मतदार संघात दिसुन येत आहे. भडगाव तालुक्यातील गुढे – वडजी गटातील गुढे येथे देखील वैशाली ताई सुर्यवंशी यांना मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असुन वैशाली ताई सुर्यवंशी ह्या मतदारांशी संवाद साधत आहेत. वैशाली ताई सुर्यवंशी यांच्या नैतृत्वावर विश्वास ठेवत गुढे येथील माजी सैनिक विजय नथ्थु महाजन यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात जाहिर पक्ष प्रवेश केला. विजय महाजन यांच्या पक्ष प्रवेशाने वैशाली सुर्यवंशी यांची पकड अधिकच मजबूत झाली आहे. ढोल ताशांच्या गजरात “वैशाली ताई तुम आगे बढो, हम तुमारे साथ है” या घोषणांनी उपस्थितांनी परिसर दणाणून सोडला आहे. पाचोरा मतदार संघात यावेळी परिवर्तनाची नांदी बघावयास मिळत आहे. गुढे सह प्रत्येक प्रचार रॅलीत विशेष म्हणजे मोठ्या संख्येने महिला, तरुणी यांची उपस्थिती दिसुन येत आहे. ठिकाणी महिलांकडून वैशाली ताईंचे औक्षण, हळदी कुंकू लावुन फुलांचा वर्षाव करत जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. एखाद्या पुरुषाला लाजवेल असा उमेदीने वैशाली ताई सुर्यवंशी यांचा प्रचाराचा झंझावात अहोरात्र सुरू आहे. याप्रसंगी डॉ. उत्तमराव महाजन, डॉ. संजय पाटील, पप्पू दादा, सतीश पाटील, तुकाराम महाजन, राजेंद्र पाटील, महेंद्र महाजन, अनिल पाटील, दिनेश बोरसे, गोकुळ पाटील, गोपाल महाजन, संजय महाजन, पांडुरंग पाटील, मनोहर डहाळे, चुडामन चौधरी, उत्तम पाटील, जगदीश पाटील, राकेश महाजन, महेंद्र मोरे, हर्षल महाजन यांचेसह गुढे येथील ग्रामस्थ, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.