जळगाव जिल्हाराजकीय

अभिनेता गोविंदाच्या रोडशोला पाचोर्‍यात नागरिकांचा उदंड प्रतिसाद


प्रकृती अस्वस्थाने रॅली अर्धवट सोडत गोविंदा मुंबईकडे रवाना

पाचोरा ता.16: पाचोरा भडगाव मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ पाचोरा व भडगाव शहरात अभिनेता गोविंदा यांच्या जाहीर रोड शोचे आयोजन करण्यात आले होते, मात्र अचानक छातीत वेदना होऊन त्यांना अस्वस्थ जाणवू लागल्याने रॅली अर्धवट सोडत ते तात्काळ मुंबईकडे रवाना झाल्याने चहात्यांचा मात्र हिरमोड झाला.

पाचोरा शहरात महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अभिनेता गोविंदा हे पाचोर्यात दाखल झाले होते. हेलीपॅड वर डॉ.प्रियंका पाटील व महिला आघाडीच्या वतीने त्यांचे औक्षण करत आमदार किशोर आप्पा पाटील व शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. पाचोरा व भडगाव शहरात त्यांच्या भव्य रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. यासाठी पाचोरा शहरात एम एम महाविद्यालयाच्या प्रांगणात हेलिपॅड ची व्यवस्था करण्यात आली होती. महाविद्यालयाच्या प्रांगणाच्या सभोवताली अभिनेता गोविंदा व आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या चाहत्यांनी गराडा घालत मोठी गर्दी केली होती. दरम्यान अभिनेता गोविंदा व आमदार किशोर आप्पा पाटील यांनी एकत्रित ओपन जीपमध्ये एकत्र येत एम एम महाविद्यालयाच्या प्रांगणापासून शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत नागरिकांना अभिवादन करत रोड शोला सुरुवात केली. मात्र अचानक त्यांना छातीत वेदना होऊन अस्वस्थपणा जाणवू लागल्याने रोड शो थांबवत ते पुन्हा हेलीपॅड करणे रवाना झाले. तेथून त्यांनी मुंबईकडे प्रयाण केले. त्यामुळे पाचोरा शहरातील त्यांचा राहिलेला अर्धवट रोड शो व भडगाव एरंडोल चोपडा मतदारसंघाचे रोडशो रद्द करण्यात आल्याने त्यांच्या चाहत्यांचा मात्र हिरमोड झाल्याचे पहावयास मिळाले.
हेलीपॅड वर बोलताना त्यांनी आपण प्रकृतीच्या कारणाने दौरा अर्धवट सोडून परत जात असल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली. तर त्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना मोठा मताधिक्क्याने निवडून देण्याचे आवाहन केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button