नगरदेवळ्यात वैशालीताई सुर्यवंशींचे अभूतपुर्व स्वागत…. जनतेच्या प्रतिसादातून मिळाली परिवर्तनाची ग्वाही
नगरदेवळा, ता. पाचोरा — पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-उबाठाच्या मशाल या चिन्हावर उभ्या असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई सुर्यवंशी यांचे ठिकठिकाणी अतिशय उत्स्फुर्त व अभूतपुर्व असे स्वागत करण्यात आले असून याप्रसंगी नागरिकांनी परिवर्तनाच्या लढ्यात सोबत राहण्याची ग्वाही दिली.
वैशालीताई सुर्यवंशी यांनी सायंकाळी नगरदेवळा गावातून भव्य प्रचार फेरी काढली. नगरदेवळा हे मतदारसंघातील मोठे व महत्वाचे गाव असल्याने येथे रात्री उशीरापर्यंत प्रचार फेरी चालली. यात ताईंनी गावातील सर्व देवस्थानांवर माथा टेकवत परिवर्तनासाठी साकडे घातले. यानंतर त्यांनी शहरातील कान्याकोपऱ्यात जाऊन मतदारांशी वार्तालाप केला. विकासाचे व्हिजन घेऊन आपण उमेदवारी करत असून यात नागरिकांनी समग्र विकासासाठी आपल्याला मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, ठिकठिकाणी वैशालीताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. तर तरूणाईचा उत्साह हा शिगेला पोहचलेला असल्याने त्यांनी बहारदार नृत्य करून ताईंचे स्वागत केले.
नगरदेवळा शहरात ठिकठिकाणी विविध मान्यवरांनी ताईंशी वार्तालाप करतांना त्यांच्या सोबत राहण्याची ग्वाही दिली. तसेच सर्वसामान्य नागरिकांनी तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांचा वारसा समर्थपणे पुढे घेऊन जाणाऱ्या वैशालीताई या मतदारसंघातील पहिल्या महिला आमदार बनतील असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, याप्रसंगी महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासह राजेंद्रसिंग देवरे, बाळू पाटील, अन्नू शेख, रमेश बाफना, छोटू लोहार, धर्मराज पाटील, बापू पाटील, ॲड. अभय पाटील, पांडुरंग भामरे, सागर गवते, गणेश परदेशी, अनिल राऊत, सोमनाथ महाजन, पंढरीनाथ चौधरी, अर्जुन महाजन, रवींद्र बापू, गायके अण्णा, दत्तू भोई, योगेश पाटील, विकी महाजन, मुकेश राजपूत, रवी महाजन, बबलू पाटील, सागर देवरे, रमेश भोई, रामचंद्र महाजन, जब्बु शेख, विजय गढरी, नितीन भोई आदी मविआचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.