पाचोरा विधानसभेत पाथरवट समाज महासंघाचा आमदार किशोर आप्पा पाटील यांना जाहीर पाठिंबा
पाचोरा –
विधानसभेच्या पाचोरा भडगाव मतदार संघात निवडणुकीत प्रचाराचा ज्वर चढत असतानाच पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा राष्ट्रवादी रिपाई पीआरपी महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांना पाथरवट समाज महासंघातर्फे जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला असून समाजातील सर्व पदाधिकारी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विजयासाठी अहोरात्र झटणार असल्याची ग्वाही त्यांनी जाहीर पत्रातून दिली आहे.
पाथरवट समाजातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी युवा जिल्हाध्यक्ष योगेश पाथरवट यांचे सह आनंद पाथरवट बबलू पाथरवट विनोद संतांची सचिन संदांशिव गजानन पाथरवट वाल्मीक सोनवणे विशाल संधान शिव चेतन साळुंखे सागर संतांची आकाश पाथरवट अजय संतांची योगेश काळे विष्णुसंदन शिव गोपाल काळे कुणाल चंदनशिव कल्पेश काळे विनोद पाथरवट सूर्यकांत पाथरवट अनिल पाथरवट संजय पाथरवट दीपक पाठरवट पांडुरंग पाथरवट आधी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याशी समाजाच्या विविध प्रश्नां संदर्भात साधक वादक चर्चा करत मतदार संघात झालेल्या विकासकापांच्या पाठीशी आपण सर्वांनी राहावं असे एकमताने ठरविण्यात आले त्यामुळे सर्वांनी आगामी निवडणुकीत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विजयासाठी अहोरात्र झटण्याचा संकल्प करत त्यांना समाजाचा जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.