भडगाव शहरात नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या प्रचार रॅलीस वाढता प्रतिसाद
भडगाव – भडगाव पाचोरा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत दुपार सत्रातील प्रचार रॅलीस मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला प्रसंगी स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रताप हरी पाटील यांचे घरोघरी औक्षण करून पूजन करण्यात आले याप्रसंगी डॉ पुनमताई पाटील बाळासाहेब जगदीश पाटील श्याम दादा पाटील डॉ कमलेश भोसले यांनी मतदारांचे आशीर्वाद घेतले ही मतदार रॅली दुपार सत्रामध्ये यशवंत नगर येथून सुरुवात होऊन वरची बर्डी,खालची बर्डी, वरची मज्जिद, शेजवळकर नगर, शिवाजी नगर, नवनाथ टेकडी, महालक्ष्मी कॉलनी, दत्तनगर ,बस स्टँड परिसरासह तिचा समारोप करण्यात आला याप्रसंगी असंख्य कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले त्यात महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती या प्रचारालीतून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत चिन्ह सप्तकीरणा असलेली पेनाची नीप हे चिन्ह घरोघरी यावेळी पोहोचवण्यात आले या रॅलीसाठी स्वराज्य पक्षाचे निमंत्रक चेतन पाटील तालुकाध्यक्ष प्रतीक पाटील यांच्यासह तरुण मित्र मंडळ व परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मतदार उपस्थित होते