सौ.मयुरी निळकंठ पाटील यांनी साधला भातखंडे खुर्द येथील महिलांशी संवाद..
पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्द येथे दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी डॉ. निळकंठ पाटील यांच्या पत्नी सौ.मयुरी निलकंठ पाटील यांनी भातखंडे खुर्द,येथील महिलांसोबत संवाद
साधला,सर्वप्रथम ग्रामपंचायत महिला सदस्य सौ.संगिताबाई कुमावत, यांच्या सत्कार करत बळीरामाची प्रतिमा देण्यात आली.
मयुरी पाटील यांनी वृंदावन हॉस्पिटल मध्ये ज्या योजना मार्फत मोफत ऑपरेशन केले जातात, त्याबाबतीत महिलांना माहिती दिली, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी डॉक्टर निळकंठ पाटील सोडवतील कारण ते स्वतः हॉस्पिटल, डॉक्टरकी सांभाळून शेती करतात, त्यांना येणाऱ्या समस्या संबंधित संपुर्ण माहिती आहे,ते विधानसभा निवडणुक लढवणार आहेत, लवकरच ते आपल्या गावात येवुन भेट घेणारचं आहे, आपण सर्वांनी त्यांना भरभरून मतदान स्वरुपात आशीर्वाद द्यावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या महिलांनी डॉ.निळकंठ पाटील यांना विधानसभेत निवडून देण्याचा निर्धार केला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य संगिता बाई कुमावत,आशा सेविका,पुष्पलता कुमावत,सरला कुमावत, आशाबाई कुमावत, अर्चना पाटील, जगदिश पाटील,सतिष कुमावत, यांचे सह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.