महायुतीच्या वतीने उद्या दि.7 ऑक्टोंबर रोजी निर्धार मेळाव्याचे आयोजन
पाचोरा – येथे महायुतीच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.आमदार किशोर आप्पा पाटील या मेळाव्याच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. मेळाव्याला केंद्रीय मंत्री ना.रक्षा खडसे, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, बांधकाम मंत्री तथा पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक दादा भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची उपस्थिती असणार आहे.
मेळाव्याच्या माध्यमातून आमदार किशोर पाटील व शिवसेनेच्या वतीने ‘चला विकासावर बोलूया’ या टॅगलाईनने जनतेशी संवाद साधणार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असून खऱ्या अर्थाने मतदारसंघात केलेल्या विकास कामांची माहिती पोहोचवणार आहेत. तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत होणारे या कार्यक्रमात पाचोरा-भडगाव मतदार संघातील विविध विकास कामांचे ई भुमिपुजन व लोकापर्ण करण्यात येणार आहे. मेळाव्याला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, बांधकाम मंत्री दादा भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची उपस्थिती असणार आहे.
दरम्यान या निर्धार मेळाव्याला पाचोरा भडगाव मतदार संघातील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच बाजार समितीचे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी नगरपालिकेचे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी,विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन व सर्व संचालक मंडळ सर्व शेतकरी बांधव व्यापारी हमाल मापाडी शिवसैनिक व सामान्य नागरिक महिला बंधू भगिनी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीच्या विविध घटक पक्षांकडून करण्यात आले आहे.