भडगाव येथील डॉ.निलकंठ पाटील आयोजित महिला सबलीकरण मेळाव्याला महिलांची तुफान गर्दी
भडगाव-
दिनांक: 03/09/2024 मंगळवार रोजी, भडगाव येथील
नारायण मंगल कार्यालय येथे 12:00 वा.महिला सबलीकरण मेळाव्याचे आयोजन वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक तथा उपाध्यक्ष वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र भाजपा, डॉ. निलकंठ पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते.
मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.डॉ.पल्लवी निलेश पाटील यांचा सत्कार सौ.मयुरी निलकंठ पाटील यांनी केल. प्रमुख पाहुणे मा. मीनाक्षी ताई निकम – चाळीसगाव (सामाजिक कार्यकर्ता ) यांचा सत्कार डॉ. निलकंठ पाटील यांनी केला.
मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक करतांना ताई म्हणाल्या कि,
नारी शक्ती मुळे देशाचा मोठा विकास होताना दिसून येत आहे.आपल्या देशाचे प्रभावी व्यक्तिमत्व पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी. तसेच मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य यांच्या सारखं नेतृत्व महिलासाठी असणाऱ्या विशेष योजना त्यांनी घेतलेले निर्णय हे महिलांसाठी प्रभावी ठरत आहेत. महिला सशक्तीकरण करण्यासाठी विविध योजनांवर भर कश्या पद्धतीने देता येईल, यासाठीच्या नवनवीन योजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.तसेच दिव्यांग असताना सुद्धा अनेकांची आई बहीण इ.भूमिका तसेच आम्हाला परमेश्वराने सर्व अवयव दिले तर समाज म्हणून आपण जगायला हवे असा संदेश तसेच आज देश विश्व गुरुपदी वाटचाल करताना दिसतोय. यात महिलांची भूमिका इत्यादी विषयावर ताईंनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात पूज्य तपस्विनी गरुवर्य आई सुषमा येळमकर सौ. प्रतिभा साठे कजगाव सौ. कल्पना मोरे गुढे, सौ. ज्योतीताई पाटील पिंपळगाव थडीचे सौ. मनीषा भाऊसाहेब पाटील आडळसे, यांचा सत्कार करण्यात आला.
अनुलोम संस्था दत्ताजी नाईक (उप विभाग जनसेवक जळगाव) श्री विठ्ठल रोहिदास बागुल वैद्यकीय आघाडी जामनेर संयोजक श्री चेतन श्री भीमराव माधव पाटील गोंडगाव श्री प्रकाश रामभाऊ पाटील खेडगाव श्री छोटू काका पाटील श्री गोकुळ आप्पा पाटील कोठली याचा सत्कार
श्री. डॉ. निलकंठ पाटील
यांनी केला.तसेच पत्रकार अशोक परदेशी यांच्या वाढदिवस असल्याने यांना शुभेच्छा देत सत्कार केला तसेच मेळाव्यात उपस्थित पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.
मेळाव्यात उपस्थित मातृशक्तीला देव, देश, धर्म, याविषयी महिलांची भूमिका काय असली पाहिजे. याविषयी सामाजिक संदेश देण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते विकासजी लोहार यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सांगितली महिलामध्ये आदर्श निर्माण करून देणाऱ्या प्रतिभा साठे(भडगाव ता. भाजपा महिला आघाडी )यांना माँ साहेब जिजाऊ यांच्या प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
यांचा सत्कार डॉ. विजय पाटील यांनी सतिष (अण्णा) पाटील शिंदाड माजी ता. पाचोरा सरचिटणीस यांनी केला.वृंदावन हॉस्पिटल संचालक डॉ निलकंठ पाटील यांनी देखील मातृशक्तीला मार्गदर्शन केले.
सदर मेळाव्यात महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थित होती. यासाठी भडगावशहरासह ग्रामीण भागातुन महिला उपस्थित होत्या. हि मातृशक्ती आजपर्यंत डॉक्टरांनी दिलेल्या आरोग्य सेवेचे दैवी दर्शन यातून घडले.
पाचोरा येथील दैवयोग मंगलकार्यालयात महिला सबलीकरण मेळावा घेण्यात आला होता.तेथेही मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती.
मेळावा संपन्न करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.