पाचोरा वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ,महालॅब व ग्रामपंचायत लोहटार यांच्या संयुक्त विद्यमानेमहिलांचे मोफत रक्त तपासणी शिबीर संपन्न..
पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील लोहटार येथे वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,महालॅब व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने महिलाचे मोफत रक्त तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सदरच्या शिबीराचा मोठ्या संख्येने महिलांनी लाभ घेतला.
वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.नीलकंठ पाटील यांनी आहिराणी भाषा बोलत शिबीरात महिलांना मार्गदर्शन केले,लोखंडी कढई लोखंडी तावा वापरल्यामुळे होणारा फायदा,तसेच महिलांना आरोग्य विषयक माहिती देण्यात आली. यावेळी नीलकंठ पाटील,जनसंपर्क अधिकारी किशोरजी सिनकर. लोहटार गावाचे सरपंच ज्ञानेश्वर वाघ, रोहिदास मांडोळे तुळशीराम माळी,महिला बचत गटाच्या सीआरपी रत्ना ओंकार पाटील, आशा शरद चौधरी, कविता निंबा चौधरी, रूपाली समाधान दहिभाते,सुनीता विनोद मोरे, अंगणवाडी सेविका अलका गुलाब पाटील लोहटार गावचे ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ.नीलकंठ पाटील पाचोरा भडगाव शहरासह ग्रामीण भागात आरोग्य तपासणी,रक्त तपासणी शिबिर घेत असतात, तसेच शेतकरी संवाद यात्रा घेवुन जास्त जास्त उत्पादन कसे घेता येईल या बाबत मार्गदर्शन करत असतात.पाचोरा-भडगाव तालुक्यात डॉ.नीलकंठ पाटील यांची शेती करणारा डॉक्टर म्हणुन ओळख निर्माण होत आहे.