पिंप्रीहाट येथील युवकांचा शिवसेना-उबाठात प्रवेश
पिंप्रीहाट येथील युवकांचा शिवसेना-उबाठात प्रवेश
भडगाव, दिनांक 18 (प्रतिनिधी ) : तालुक्यातील पिंप्रीहाट येथील युवकांनी वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला.
पिंप्रीहाट येथील कल्पेश मेघराज पाटील, राजेश विलास पाटील, निखील विजय देसले, हितेश संभाजी पाटील, निलेश संजय देसले, टिनेश रवींद्र देसले, तुषार शिवाजी पाटील, देवेश प्रकाश पाटील, मयुरेश विलास पाटील, विशाल राजेंद्र पाटील, वैभव संजय पाटील व सचिन संजय पाटील यांनी आज वैशालीताई सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत हातात मशाल घेत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला.
वैशालीताई सुर्यवंशी यांनी या सर्वांचे स्वागत केले. याप्रसंगी त्यांच्यासह योजनाताई पाटील, जे.के पाटील, दीपक पाटील यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.