परधाडे जि.प.शाळेत विद्यार्थ्यांची गैरसोय ध्वजारोहणास बसण्यास जागा नाही
परधाडे ता पाचोरा – परधाडे येथील जि.प. प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यदिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, शाळेच्या बांधकाम कामामुळे विद्यार्थ्यांची मोठी उपेक्षा झाल्याचे दिसून आले.
शाळेच्या 2-3 खोल्यांचे बांधकाम सुरू असल्याने ठेकेदार यांचा समान ने आण करणारे वाहनांमुळे मैदानात मोठ्या चाऱ्या पडल्या आहेत तसेच मैदानात ग्राम पंचायत ची पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन लिकेज असल्याने नेहमी चिखल असल्याने विद्यार्थ्यांना ध्वजारोहण समारंभासाठी पुरेसे जागा उपलब्ध नव्हती. परिणामी, मुलांना मिळेल तिथे बसून समारंभ पहावा लागला. यामुळे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात असंतोष पसरला आहे.
स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या मते, शाळा दररोज भरते, पण बांधकामकामामुळे विद्यार्थ्यांना मैदानात खेळण्याची पुरेशी जागा नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासावर परिणाम होत आहे.
या संदर्भात, शाळा बांधकाम करणारे ठेकेदार आणि शाळा मुख्याध्यापक, शिक्षक,प्रशासन यांच्यावर दुर्लक्षाचा आरोप करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून देण्यात शाळा प्रशासन अपयशी ठरत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.