स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने हर घर तिरंगा हे अभियानानिमित्त रॅली
पाचोरा – स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने दि. १३ ऑगस्ट रोजी पाचोरा नगरपरिषद व श्री. गो. से, हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.गो.से.हायस्कूल ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हुतात्मा स्मारक तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता घोषणा देत रॅलीला सुरुवात झाली भुयारी मार्ग ,छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे काढण्यात आली व हुतात्मा स्मारक या ठिकाणी रॅलीचा समारोप घोषवाक्य व राष्ट्रगीताने करण्यात आला.यावेळी शहरातील विविध सामाजिक संघटना, गो. से स्कूल चे मुख्याध्यापक एन. आर.
ठाकरे , उपमुख्याध्यापक आर, एल, पाटील , पर्यवेक्षिका ए.आर, गोहिल , तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील, किमान
कौशल्य विभागप्रमुख एम, बी, बावीस्कर सह शिक्षक कर्मचारीवृंद तसेच या तिरंगा रॅलीत प्रामुख्याने पाचोरा नगर परिषद चे
मुख्याधिकारी मंगेश देवरे , उपमुक्याधिकारी दुर्गेश सोनवणे, कर आदीक्षक डी. एस. मराठे सह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकवून त्यासोबत सेल्फी घेऊन तो www.harghar tiranga.com या
संकेतस्थळावर अपलोड करावा, असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मंगेश देवरे यांनी केले आहे.