राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार वितरण समारंभात माननिय तालुका कृषी अधिकारी रमेश निना जाधव सन्मानित
राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार वितरण समारंभ 10 ऑगस्ट रोजी रावसाहेब थोरात नाट्यगृहात नाशिक येथे संपन्न झाला. संस्थेच्या वतीने ब्लड कॅम्प, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांर्साठी व्यक्तिमत्व विकास शिबिरे यांचे राज्यस्तरावर आयोजन करणे, विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी सातत्याने प्रयत्न, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे अनेक जिल्ह्यात वाटप करून सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणे, मोठ्या प्रमाणात गावागावात वृक्षारोपण करणे, सर्व स्तरातील महिला/ पुरुष विशेतः विद्यार्थी यांच्याकरिता आरोग्य तपासणी शिबीरे यांचे आयोजन केले जाते. समाजासाठी झोकून आपआपल्याला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणी जणांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करणे आदी आदी उपक्रम राबविले जातात. आज खालील उल्लेखित मान्यवरांचा सन्मान वीरपत्नी हर्षदा खैरनार व संतोषआप्पा मराठे, प्रदेश सरचिटनीस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र, मा. श्यामभाऊ जाधव, सुपरिचित उद्योजक, शहादा, नंदुरबार, आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी केले, आभार गणेश चव्हाण यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष पाटील, अमोल पाटील, संतोषभाऊ पाचपाटील, गणेश चव्हाण सह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
सन्मा. रमेश निना जाधव, तालुका कृषी अधिकारी, पाचोरा, जळगाव
सन्मा. सचिन पांडुरंग पाटील, कृषी पर्यवेक्षक, जि. जळगाव
सन्मा. दिनकर धर्माजी पाटील, प्रदेश निमंत्रित सदस्य, भारतीय जनता पार्टी
सन्मा. श्रेयश राजेंद्र आढाव, यशस्वी उद्योजक, नाशिक तथा सेवानिवृत स्कॉड्रन लीडर, भारतीय वायुसेना
सन्मा. विलास दिनकर जवंजाळकर, युवा उद्योजक, नाशिक
सन्मा. सौ. ज्योती देविदास बोरसे ( पाटील), सभापती, महिला व बालकल्याण समिती, जि. प. धुळे