रेल्वे गेट नंबर १३३ पाचोरा भातखंडे खुर्द भुयारी मध्ये मोठ-मोठे खड्डे चिखल…
रेल्वे गेट नंबर १३३ पाचोरा भातखंडे खुर्द भुयारी मध्ये मोठ-मोठे खड्डे चिखल…
पाचोरा-
रेल्वे गेट क्रमांक १३३ पाचोरा भातखंडे खुर्द, रस्त्यावरील रेल्वे भुयारी मध्ये मोठ-मोठे खड्डे पडून, साईटला मोठ्या प्रमाणात चिखल,जमा झालेला आहे.
भुयारी मार्गात खड्डे पडल्यामुळे त्या ठिकाणी पाचोरा येथे दैनंदिन कामकाजासाठी ये-जा करणाऱ्या नागरीकांचे छोटे मोठे अपघात होत आहेत.
गेल्या काही महिन्यापुर्वीच, रेल्वे भुयारी मार्गात साचलेल्या पाण्याच्या व्यवस्थीत निचरा होण्यासाठी, काँक्रिटीकरण करत,लेव्हल करण्यात आली,
परंतु ती लेव्हल थातुरमातुर केल्यामुळे त्या ठिकाणातील साचलेल्या पाण्याचा पुर्णपणे निचरा होत नाही,त्या ठिकाणी खड्डे, चिखल झाल्यामुळे मोटरसायकली स्लीप होत, अपघात होत आहेत.
याबाबत संबंधित ठेकेदाराने दखल घेवून भुयारी मार्गातील खड्डे बुजवत पाणी साचु नये अश्या पध्दतीने व्यवस्थित लेव्हल करावी,अशी मागणी जोर धरत आहे.