श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे 17 वर्षाखालील मुला मुलींच्या तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन
श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे 17 वर्षाखालील मुला मुलींच्या तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन
पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कूल, पाचोरा येथे 17 वर्षाखालील मुला मुलींच्या तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात झाली.स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख हे अध्यक्ष स्थानी होते व माजी मुख्याध्यापक सौ.पी.एम.वाघ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एन आर ठाकरे पर्यवेक्षिका सौ. ए.आर. गोहिल किमान कौशल्य विभाग प्रमुख एम. बी. बाविस्कर कार्यालय अधीक्षक अजय सिनकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एन आर ठाकरे यांनी केले सौ पी.एम.वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षही खलील देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर बी बोरसे सर तसेच आभार सौ एस. व्ही साळुंखे यांनी केले. स्पर्धेचे प्रमुख पंच अभिषेक जाधव यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी क्रीडा शिक्षक एस एस दत्तू यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला सर्व क्रीडा शिक्षक उपस्थित होते