जळगाव जिल्हामहाराष्ट्रराजकीय

उबाठा नेत्या सौ.वैशालीताई सूर्यवंशी यांचा पत्रकार संवाद; १५० पत्रकारांना मोफत विमा कवच..


उबाठा नेत्या सौ.वैशालीताई सूर्यवंशी यांचा पत्रकार संवाद; १५० पत्रकारांना मोफत विमा कवच..

पाचोरा-

पाचोरा येथील निर्मल सिड्स येथे उबाठा नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी पाचोरा-भडगाव मतदार संघातील पत्रकारांना आमंत्रित करत संवाद साधला.या कार्यक्रमात मान्यवरांनी भाषणे दिले त्यामध्ये शेतकरी सेनेचे अरुण पाटील,गणेश परदेशी अँड अभय पाटील तसेच काही पत्रकारांनी मार्गदर्शन केले असून यावेळी सौ वैशालीताई सूर्यवंशी यांनी १५० पत्रकारांच्या संरक्षणासाठी अपघात विमा काढण्यात आला असून पत्रकारांची हमी व पत्रकारांना भविष्यात घरकुल योजना सुख सुविधा उपलब्ध करून देईल त्यांनी त्यावेळी सांगितले तसेच पत्रकारांनी आपल्या व्यथा मांडल्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी खरोखर पत्रकारांची जाण ठेवली असून पत्रकारांचे बातमीसाठी धावपळ कुठली आशा न बाळगता प्रत्येकाच्या चांगल्या बातम्या लावण्यासाठी तसेच काही राजकीय नेते असो एकाची बाजू न घेता सर्वांच्या बाजूने बातमी लावून न्याय देत असतात अशावेळी तुम्ही माझेही काही चुकले व माझ्या विरोधात लिहिले तरी मी त्याच्यातून बोध घेऊन माझ्या झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेन,
व पत्रकारांनी आश्वासन न देता प्रत्यक्षात विमा काढून त्यांना त्यांच्या सुरक्षेची हमी दिली.यावेळी भडगाव पाचोरा तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते तसेच पत्रकारांनी स्नेह भोजनाचा लाभ देखील घेतला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button