स्व.मा.मंत्री बापूसाहेब के.एम.पाटील यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने मुक बधीर विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन…
स्व.मा.मंत्री बापूसाहेब के.एम.पाटील यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने मुक बधीर विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन…
पाचोरा-
स्व.मा.मंत्री बापूसाहेब के .एम पाटील यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील मुक बधीर रहिवासी विद्यालयाच्या विशेष विद्यार्थाना मिष्ठान्न भोजन देऊन. बापूसाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत पुजन करण्यात आले. त्यांच्या शिक्षण, सहकार,उद्योग,व जल क्रांती संदर्भात केलेल्या विकासशील कामांची आठवण करून त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास विशेष सहकार्य विद्यालयाचे अध्यक्ष पी.बी.पाटील व काँग्रेस जिल्हा चिटणीस राजेंद्र महाजन ,नितीन पाटील यांचे लाभले.कार्यक्रमास डॉ.निळकंठ पाटील (वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा संचालक)रवींद्र पाटील व बापूसाहेब के.एम.पाटलांचे नातू जयदेव अनिल पाटील उपस्थीत होते.