वैशालीताई… आम्ही तुमच्या लढ्यात सोबत आहोत ! कुरंगी येथील महिलांचा ‘शिवसेना-उबाठा’त प्रवेश
वैशालीताई… आम्ही तुमच्या लढ्यात सोबत आहोत !
कुरंगी येथील महिलांचा ‘शिवसेना-उबाठा’त प्रवेश
*पाचोरा, दिनांक 2 (प्रतिनिधी )* : भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सोबत आम्ही उभ्या ठाकणार असून त्यांचे निर्दालन केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत असा आशावाद तालुक्यातील कुरंगी येथील महिलांनी व्यक्त केला. वैशालीताईंच्या नेतृत्वाखाली शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतल्यानंतर त्या बोलत होत्या.
पाचोरा-भडगाव तालुक्यातील भ्रष्ट राजकीय व्यवस्थेच्या विरोधात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी रणशिंग फुंकले असून त्यांना मतदारसंघातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तर अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात त्यांच्या सोबत येणाऱ्यांचे प्रमाण देखील लक्षणीय पध्दतीत वाढले आहे. यात महिलांचा देखील मोठा सहभाग आहे. या अनुषंगाने पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील पन्नास पेक्षा जास्त महिलांनी वैशालीताईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला.
वैशालीताई सुर्यवंशी यांनी परिवर्तनाच्या लढाईत महिलांचे योगदान महत्वाचे राहणार असून आपण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द राहणार असल्याचे प्रतिपादन केले. या प्रवेश सोहळ्याला वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यासह डॉ. अस्मिता पाटील, अरूण पाटील, शरद पाटील, दादाभाऊ चौधरी, संदीप जैन, शशी बोरसे, धर्मराज पाटील, भिकन वाघ, किरण पाटील, सागर पाटील, डॉ. सूर्यकांत पवार, रामचंद्र पवार, ज्ञानेश्वर पाटील, रवींद्र पवार, वासुदेव पाटील, अभिषेक गिरी, जितेंद्र धनगर, आबा दत्तू पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#पक्षप्रवेश #Shivsena #shivsenauddhavbalasahebthackeray #pachora #bhadgaon