श्री.गो.से. हायस्कूल च्या मुख्याध्यापक पदी श्री.एन. आर. ठाकरे सर व उपमुख्याध्यापक पदी श्री.आर.एल.पाटील सर यांची नियुक्ती.
श्री.गो.से. हायस्कूल च्या मुख्याध्यापक पदी श्री.एन. आर. ठाकरे सर व उपमुख्याध्यापक पदी श्री.आर.एल.पाटील सर यांची नियुक्ती.
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. पी.एम. वाघ मॅडम या नियत वयोमानानुसार दि.31जुलै रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्या रिक्त पदावर मुख्याध्यापक म्हणून संस्थेने श्री.एन. आर. ठाकरे सर व उपमुख्याध्यापक या रिक्त पदावर श्री. आर.एल.पाटील सर यांना संस्थेचे चेअरमन मा.नानासो. श्री. संजयजी वाघ व व्हॉ.चेअरमन मा.नानासो. श्री.व्ही.टी. जोशी यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आला.
… याप्रसंगी शालेय समितीचे चेअरमन मा.दादासो.श्री.खलील देशमुख,तांत्रिक विभागाचे चेअरमन मा.अण्णासाहेब श्री.वासुदेव महाजन मुख्याध्यापिका सौ.पी.एम.वाघ मॅडम मुख्य लिपिक अजय सिनकर आकाश वाघ हे उपस्थित होते.
. त्यांच्या या नियुक्तीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.भाऊसो. श्री. दिलीप वाघ, संस्थेचे चेअरमन मा. नानासो.श्री. संजयजी वाघ, संस्थेचे मानद सचिव मा. दादासो. ऍड.श्री.महेश देशमुख, व्हा.चेअरमन मा. नानासो.श्री. व्हि.टी. जोशी,शालेय समिती चेअरमन मा.दादासो.श्री.खलील देशमुख,तांत्रिक विभागाचे चेअरमन मा.अण्णासाहेब श्री. वासुदेव महाजन यांनी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.