जळगाव जिल्हामहाराष्ट्र

रोटरी क्लब पाचोरा भडगावचा पदग्रहण समारंभ उत्साहात


रोटरी क्लब पाचोरा भडगावचा
पदग्रहण समारंभ उत्साहात

पाचोरा: येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगावचा पदग्रहण समारंभ काल तारीख 26 रोजी उत्साहात संपन्न झाला. स्वप्नशिल्प रेसिडेन्सी पाचोरा येथे संपन्न झालेल्या या सोहळ्याला रोटरी चे नियोजित प्रांतपाल रो. डॉ. राजेश पाटील, उपप्रांतपाल रो. अभिजीत भंडारकर, मोटिवेशनल स्पीकर रो.गनी मेमन उपस्थित होते. मावळते अध्यक्ष प्रा. डॉ. पंकज शिंदे व मावळते सचिव रो. डॉ.मुकेश तेली यांचे कडून नूतन वर्षाचे अध्यक्ष रो. डॉ. पवनसिंग पाटील व सेक्रेटरी रो. शिवाजी शिंदे यांनी पदभार स्वीकारला.

दीप प्रज्वलन व मान्यवरांच्या सत्काराने कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी कारगिल दिनानिमित्त शहिदांना शब्दसुमनांची भावांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी कवि. पांडुरंग सुतार, आदर्श शिक्षक डॉ. संजय पाटील व प्रा. राजेंद्र चिंचोले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपप्रांतपाल रो. अभिजीत भंडारकर यांनी प्रांतपाल रो. राजिंदर खुराणा यांचा संदेश वाचून दाखवला. रोटरी प्रांत 3030 चे भावी प्रांतपाल रो. डॉ.राजेश पाटील यांनी ओघवत्या शैलीत रोटरीचा परिचय करून दिला. प्रमुख वक्ते गनी मेमन यांनी आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्व शैलीतून सहज -सोप्या व आनंदी जीवनाचे गमक आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

या निमित्ताने श्रीमती अरुणा उदावंत, प्रा. गौरव चौधरी, शरद मराठे, चंद्रकांत पाटील, गिरीश दुसाने, डॉ. मुकेश राठोड, डॉ. अंकुर झंवर, डॉ. राहुल काटकर, रावसाहेब बोरसे यांना रोटरी क्लबचे सदस्यत्व देण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित पत्रकार व क्लबच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

मावळते सेक्रेटरी रो. डॉ. मुकेश तेली यांनी प्रास्ताविक केले. मावळते अध्यक्ष डॉ. पंकज शिंदे यांनी आपला वर्षभरातील कामाचा आढावा अहवाल सादर केला. नूतन अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील यांनी आपल्या मनोगतातून आगामी वर्षाचा संकल्प जाहीर केला. तर नूतन सेक्रेटरी रो. शिवाजी शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रा. सी.एन. चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. रोटरी क्लब च्या सदस्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button