मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पात्र धारकांनी अर्ज करण्याचे आवाहन
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पात्र धारकांनी अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव दि. 26 ( जिमाका ) महाराष्ट्र शासनाने
राज्यातील शहरी व ग्रामिण युवक युवतीची वाढती संख्या व उद्योग / व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वंयरोजगार रोजगाराच्या नविन संधी विचारात घेवुन उद्योजकांना चालना देणारी सर्व समावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या नावाने महत्वकाांक्षी योजना सन २०१९-२० पासुन राज्यात जिल्हा उद्योग केंद्र व खादीग्रामोद्योग मंडळ या कार्यालयांमार्फत राबविण्यात येत आहे.या योजनेसाठी पात्र उमेदरांनी अर्ज करावा असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडून करण्यात आले आहे.
या योजनेत कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहीवासी ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण अधिकतम ४५ वर्ष (अनुसुचित जाती / जमाती / महोला / इतर मागास वर्ग अपंग माजी सैनिक विमुक्त व भटक्या जमाती / अल्पसंख्याक यांच्यासाठी ५ वर्ष शिथिल) पात्र राहतील. सदर योजनेसाठी शैक्षणिक पात्रता ही १) रु. १० पर्यंतच्या प्रकल्पासाठी ७ वी उत्तीर्ण व २) रु. २५ लाखा वरील प्रकल्पासाठी १० उत्तीर्ण असणे बावश्यक आहे. तसेच अर्जदाराने यापुर्वी शासनाच्या कोणत्याही अनुदानावर आधारीत स्वंयरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा. (कोणत्याही योजनेत अनुदान घेतलेले नसावे.)
सदर योजनेत उत्पादन व्यवसायासाठी (उदा, बेकरी उत्पादन, पशुखादय निर्मिती, फॅब्रिकेशन, इ.) रु. ५० लाख पर्यंतच्या प्रकल्पासाठी अर्ज करता येईल. व संथा उद्योग व्यवसायासाठी (उदा. सलुन/रिपेअरींग व्यवसाय, ब्यूटी पार्लर, इ.) रु. २० लाख पर्यंत अर्ज करता येईल. या योजनेत अनुसुचित जाती/जमाती / महीला/ इतर मागास वर्ग / अपंग / माजी सैनिक या प्रवगांतील अर्जदार शहरी भागासाठी बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्प किंमतीच्या २५ टक्के अनुदान व ग्रामिण भागासाठी २५ टक्के अनुदानासाठी पात्र असेल. त्यासाठी त्यांना स्वगुंतवणूक ५ टक्के करावी लागेल. उर्वरीत सर्व प्रवर्गातील अर्जदार हा शहरी भागासाठी १५ टक्के व ग्रामिण भागासाठी २५ टक्के अनुदानासाठी पात्र असेल. या लाभार्थीना १० टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने http://maha-cmegp.gov.in वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज करतांना अर्जदारास स्वतःया फोटो, आधार कार्ड, (रहीबास दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला), मार्कशीट, पैन कार्ड, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला व वेबसाईट वरुन डाउनलोड करुन पूर्ण भरलेले हमीपत्र (Undertaking form) ही कागदपत्रे Upolod करावी लागतात.
जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवती ज्यांना नविन उद्योग व्यवसाय सुरु करावयाचा आहे. त्यांनी वरील वेबसाईटवर अर्ज करावेत किंवा योजनांबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र / खादीग्रामोद्योग मंडळ, शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज समोर, जळगाव येथे कार्यालयीन कामाचे दिवशी प्रत्यक्ष भेट द्यावी. तसेच सदर योजना राबविण्यासाठी या कार्यालयाकडून कोणत्याही खाजगी व्यक्तीची नेमणुक केलेली नाही. व सदर योजनेचा लाभ घेण्यात आपली खाजगी व्यक्ती कडून फसवणूक झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.. तरी जिल्हयातील जास्तीतजास्त पात्र अर्जदारांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर परिपूर्ण आवश्यक कागदपत्रासह अर्ज करण्याबाबत महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांनी आवाहन केले आहे. जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव दुरध्वनी क्र. ०२५७-२२५२८३२ असून ईमेल आयडी didicjalgaon@gmail.com असा आहे.