भडगाव येथील पोलीस कर्मचारी 50 हजाराची लाच घेतांना एसीबी च्या जाळ्यात
भडगाव येथील पोलीस कर्मचारी 50 हजाराची लाच घेतांना एसीबी च्या जाळ्यात
भडगाव- वाळू व्यावसायिकांवर दाखल असलेले दोन गुन्हे असतांना सुरळीत वाळू वाहतुकीसाठी २ लाख ६० हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५० हजारांची रक्कम स्वीकारतांना भडगाव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत हवालदारावर जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सकाळी भडगाव पोलीस स्टेशनच्या आवारात लाच स्विकारतांना अटक केल्याची कारवाई केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
किरण रविंद्र पाटील(वय ४१) व्यवसाय नोकरी पोलिस हवालदार भडगांव पोलिस स्टेशन नेमणूक असे या हवालदाराचे नाव आहे.
तक्रारदार हे भडगाव येथील रहिवाशी असून त्यांना भडगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत किरण रवींद्र पाटील यांनी दि
२५ रोजी तक्रारदाराकडे सुरळीत वाळू वाहतूक करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी हवालदार किरण पाटील याने तक्रारदार यांचेकडे २ लाख ६० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या बाबत तक्रारदार यांनी तक्रार दिली होती. तक्रारीची दिनांक २५ रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता किरण पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे २,६०,००० रुपयांची मागणी करून त्यातील पहिला हप्ता म्हणून तडजोडीअंती पंचासमक्ष ५०,०००/- रुपये लाच रक्कम घेताना रंगेहात पकडण्यात आले . याबाबत भडगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
किरण पाटील यांचा पोलीस दलात उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल नुकतेच प्रशस्ती पत्रक देऊन काल २५ जुलै रोजी सत्कार करण्यात आला होता . त्यांनतर लाचलुचपत विभागाच्या पथकाला मिळालेल्या तक्रारीनुसार त्यांच्यावर लाच स्वीकारतांना रंगेहात पकडल्याची कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नाशिक परिक्षेत्र, नाशिक. शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधिक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाचे पोलीस उप अधिक्षक सुहास देशमुख ,पोलिस निरीक्षक नेत्रा जाधव, पोउपनि. दिनेशसिंग पाटील, पोकॉ. राकेश दुसाने, पोकॉ. अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने केली आहे.