शिवसेना शहरप्रमुख अनिल सावंत आयोजित मतदान नाव नोंदणी अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवसेना शहरप्रमुख अनिल सावंत आयोजित मतदान नाव नोंदणी अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पाचोरा : शहरातील शिवसेना उबाठा गटाचे शहरप्रमुख अनिल सावंत यांच्या देशमुखवडी भागातील संपर्क कार्यालय येथे शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या संकल्पनेनुसार मतदान नाव नोंदणी व दुरुस्ती अभियान राबवण्यात आले.
शिवसेना शहरप्रमुख अनिल सावंत आयोजित मतदान कार्ड नाव नोंदणी व दुरुस्ती अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून 200 हुन अधिक नागरिकांनी नवीन मतदान कार्ड साठी नाव नोंदणी केली.
या कार्यक्रमासाठी शहर प्रमुख अनिल सावंत, युवा सेना उपजिल्हाधिकारी संदिप जैन, उपशहर प्रमुख अभिषेक खंडेलवाल, खंडू सोनवणे. पप्पू जाधव, संजय चौधरी, रवि सोनवणे, राकेश जोशी, राजु जाहागीरदार, नयन पाटील, छोटू मिस्त्री, नितीन खेडकर, युवा सेना शहर प्रमुख मनोज चौधरी, हरीष देवरे, मोतीलाल चौधरी, कैलास अहिरे, राकेश सावंत आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.