श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे वाहतूक सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन शिबिर संपन्न.
श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे वाहतूक सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन शिबिर संपन्न.
… पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे दि. 22 जुलै रोजी वाहतूक सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.
पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा.श्री. गणगे साहेब यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम. वाघ मॅडम यांच्या हस्ते मा. श्री.गणगे साहेब यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक श्री. गनगे साहेब यांनी इ. 10वी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नवीन कायदे, सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, आर्थिक फसवणुकीचे गुन्हे, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी व विद्यार्थ्यांनी, पालकांनी मोबाईल वापरताना घ्यावयाची काळजी याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रम संपल्यानंतर श्री. गणगे साहेब यांनी इ. 10 वी च्या विद्यार्थ्यांशी हितुगुज साधले.
याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक श्री.एन.आर.ठाकरे सर, पर्यवेक्षक श्री. आर.एल.पाटील सर, श्री.ए.बी.अहिरे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.आर.बी. तडवी सर यांची उपस्थिती होती.
श्री.उज्वल पाटील सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.