शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा धमाका वडजीतील शेकडो तरूणांचा पक्षात प्रवेश
शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा धमाका
वडजीतील शेकडो तरूणांचा पक्षात प्रवेश
भडगाव, दिनांक २२ (प्रतिनिधी) : वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेणार्यांची जणू काही रीघ लागली असून आज झालेल्या दुसर्या सोहळ्यात वडजी येथील शेकडो तरूणांनी प्रवेश घेतल्याने पक्षाची बाजू भक्कम झाली आहे.
आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दुसरा प्रवेश सोहळा पार पडला. यात वडजी येथील शेकडो तरूणांनी हातात भगवा घेत परिवर्तनाच्या लढ्यात सहभागी होण्याचा संकल्प केला. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी या सर्व प्रवेश घेणार्यांचे स्वागत करून पक्षाचा विचार हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत नेतांनाच सर्वसामान्यांच्या हितासाठी झटण्याचे आवाहन केले. वडजी येथील तरूणाईने मोठ्या संख्येने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पसंती दिल्यामुळे परिसरात पक्षाची स्थिती भक्कम झाली आहे.
आजच्या प्रवेश सोहळ्याला शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यासह दीपक पाटील, जे. के. पाटील, योजनाताई पाटील, डी. डी. पाटील सर, पप्पू दादा ( रामकृष्ण पाटील); राजू मोरे, फकीरा पाटील, इंदल परदेशी, लहू आबा, भगवान आबा, भारत आप्पा, किसान आबा, गणादादा, महेमूद पटेल, संभाजी मोरे, नाना रावण, भिला भगवान, आसीफ पटेल, बादल पटेल, रोशन पटेल, शोएब शेख, नामदेव बापू, रवींद्र पाटील, फरीद पटेल, मंजूर पटेल, आबा पवार, नसरू शाहा, जिभू न्हावी, ज्ञानेश्वर सोनवणे, फकीरा संतोष, अशोक शिंदे, नाना अहिरे आदींसह शिवसैनिक व युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.